Breaking News

17 वर्षाच्या पुतणीची गळा आवळून केली हत्या


पुण्यातल्या धायरीत 17 वर्षांच्या तरुणीचा तिच्या घरातच गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला होता. यावर आज पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण मुलीच्या सख्या काकाने तिची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

वैशाली भोसले असं या मुलीचं नाव आहे. ती 11वीमध्ये शिकत होती. सुरुवातीला तिच्यावर काकाने अत्याचार केले आणि तिने ते कोणाला सांगू नये यासाठी तिची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

नितीन दामोदर असं मृत मुलीच्या काकाचं नाव आहे. नितीन म्हणजे वैशालीच्या मावशीचा नवरा आहे. त्यानेच तिची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोपी नितीन दामोदर हा नर्हेमध्ये राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून आता या प्रकरणाचा कसून तपास घेत आहेत.