अन्यथा 26 रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन


बिदाल (प्रतिनिधी) : धनगर समाजाचा आरक्षण प्रश्‍न प्रलंबित असल्याने शासनाने जाहीर केलेली मेगा नोकरी भरतीला स्थगिती द्यावी. जोपर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्‍न निकाली निघत नाही. तोपर्यंत कोणतीही मेगा भरती शासनाने करु नये, अन्यथा धनगर समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यंशवत युवा सेनेचे प्रदेशअध्यक्ष सचिन होनमाने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सचिन होनमाने, समीर घुटूकटे, विनोद गोरड, तात्याराम दडस यांनी माण तहसीलदारांना यांना दिले. 

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक मांडून ते विधानसभेत मंजूर करुन घेतले आहे. लगेच 72 हजार जागांची मेगा भरतीची कार्यवाही चालू केली आहे. आम्हाला सत्ता द्या. आम्ही पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे बारामतीच्या जाहीर सभेत बोलणारे भाजपाचे त्यावेळचे विरोधी पक्षनेते व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेल्या 4 वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण द्यायला विलंब करत आहे. धनगर समाजाचा एसटी या प्रवर्गात समाविष्ट करण्यात शासनाने उघडपणे डोळेझाक केली आहे. 31 ऑगस्ट रोजी शासनाकडे अहवाल दाखल झाला आहे. संस्थेने महाराष्ट्रात धनगर कुठेच नसलेला पुरावा शासनाकडे दाखल केला आहे. जोपर्यंत धनगर समाजाचा प्रश्‍न निकाली निघत नाही. तोपर्यंत कोणतीही मेगा भरती शासनाने करु नये, अन्यथा 26 जानेवारी रोजी माण तहसीलदार कार्यलायावर तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका प्रा. होनमाने धनगर समाजातील युवकांनी घेतली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget