Breaking News

563 केसेेसद्वारे 4 लाखांचा दंड वसूलनगर । प्रतिनिधी -
नगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुुरु करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीच्या मोहिमेद्वारे दुचाकी वाहनचालकांवर दोन दिवसांत 563 केसेस करण्यात आल्या. यातून 3 लाख 81 हजार पाचशे आणि सीट बेल्ट न लावता वाहन चालविल्याबद्दल 69 हजार रुपये सुमारे 4 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. सीट बेल्ट नसलेल्या वाहनचालकांना 345 केसेसद्वारे 69 हजार रुपये दंड करण्यात आला. दरम्यान, ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून येत्या दि. 10 पासून जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी ‘अहमदनगर घडामोडी’शी बोलताना दिली.

हेल्मेटसक्तीच्या मोहिमेसंदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळ्या ‘पोस्ट’ टाकल्या जात आहेत. ही मोहीम शिथिल करण्यात आल्याची अफवाही पसरविण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस नियंत्रक मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ही मोहीम शिथिल करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस यंत्रणेला दि. 10 डिसेंबर ही ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा वाहतूक शाखेमार्फत ही कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, मनपा निवडणुकीत विविध पक्षांच्यावतीने दुचाकी वाहनांची रॅली काढण्यात येत असून यामध्ये अनेकजण विनाहेल्मेट असतात. या मुद्द्याकडे पो. नि. मोरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ‘घाईत’ असल्याचे सांगत यावर अधिक बोलणे टाळले.