बुलडाणा प्राइडला 61 हजार रूपयाचा दंड; अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसिलदाराचे आदेश


बुलडाणा,(प्रतिनिधी): बांधकामासाठीच्या उत्खननात परवानगीपेक्षा 1509 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन प्रकरणी बुलडाणा प्राइडला 51 लाख 30 हजार 600 रुपये व 743 ब्रासच्या अवैध उत्खनन प्रकरणी 10 लाख 10 हजार 480 रुपये असा 61 लाख 41 हजार 80 रुपयांचा दंड बुलडाण्याचे तहसीलदार यांनी 24 डिसेंबर रोजी एका आदेशाने केला आहे. या प्रकरणी मिठू जालन व जितू कायस्थ यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार मिळालेल्या अहवालावरून हा निर्णय तहसीलदारांनी घेतला आहे. या विरुद्ध बुलडाणा प्राइड अपील दाखल करणार असल्याचे समजते.


या बाबत तहसीलदार सुरेश बगळे यांनी आदेशात म्हटले आहे की तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून प्रकरणासह अहवाल व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून जागेची आखीव पत्रिका, हक्क नोंदणी, जागेचा भूमापन नकाशा मागवून स्वयंस्पष्ट अभिप्राय मागवला होता. या प्रकरणात उप विभागीय अधिकारी यांचे पत्रानुसार बांधकाम थांबवण्याबाबत नमूद केले होते. तर 5 डिसेंबर 2018 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचा तांत्रिक अहवाल मागवण्यात आला होता. तर बुलडाणा प्राइडचे अनंतराव देशपांडे यांनासुद्धा जागेत किती खोदकाम केले. किती ब्रास गौणखनीज निघाले व त्याचे विल्हेवाट काय केली. शासकीय नियमानुसार गौणखनिजांची परवानगी घेतली किंवा का याबाबत सात दिवसाचे आत लेखी म्हणणे मागितले होते. परंतु, त्यांनी कोणतेही म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे 18 डिसेंबर रोजी पुन्हा तीन दिवसाचे आत म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचा तांत्रिक अहवाल 19 डिसेंबर रोजी प्राप्त झाला. त्यांनी मुरूम मधील खोदकाम 1819 ब्रास उत्खनन व मातीमध्ये 743 ब्रास उत्खनन केल्याबाबत नमूद केले आहे. मुख्याधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचा अहवाल मात्र प्राप्त झाला नसल्याचे नायब तहसीलदारांच्या अहवालात नमूद आहे. नायब तहसीलदार महसूल व उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन जागेचे मोजमाप केले असता उत्खनन झालल्या जागी गौणखनीज आढळून आले नाही. या बाबत बुलडाणा प्राइडचे अनंतराव देशपांडे यांनी आपला जवाब 24 डिसेंबर रोजी सादर करून बांधकामाची परवानगी मुख्याधिकारी यांच्याकडून रीतसर प्राप्त केली आहे. खोदकाम 50 फूट नसून 10.5 खोल केले आहे. खोदकामातून निघालेली माती व मुरुमाची साठवणूक लहाने ले आऊट मधील खुल्या जागेत करण्यात आले आहे. या बांधकामातून निघालेला मुरूम हा अंदाजे 1850 ते 1875 ब्रास असून त्यापैकी 1200 ब्रास मुरूम परत बांधकामावर भराव म्हणून वापरण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget