Breaking News

73 वा वार्षिक यात्रा महोत्सव उत्साहात सपंन्न

राहता/प्रतिनिधी
संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहाता येथे 73 वा वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2 नोव्हेंबर यादिवशी संत फ्रान्सिस झेवियर या संताची दरवर्षी राहाता येथील चर्चच्या आवारात यात्रा संपन्न होते.

 प्रेम, सेवा, त्याग या ध्येयाने प्रेरीत झालेल्या या संताने भारत, गोवा, जपान, चीन या देशामध्ये प्रवास करुन येशु ख्रिस्तांचा शांतीचा प्रेमाचा संदेश जगाला दिला. या धार्मिक सोहळ्यासाठी नाशिक धर्मप्रांताचे बिशप डॉ. लुर्डस डॅनियल उपस्थित होते. या यात्रेनिमित्त भव्य रोशणाई करण्यात आली होती. डॉ. लुर्डस डॅनियल यांनी भाविकांना आपल्या प्रवचनात सांगितले की, आपल्या बालकांना परमेश्‍वराच्या प्रेमाचा अनुभव देवून परमेश्‍वराच्या प्रेमात संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले. बालकांच्या अध्यात्मिक जीवनाच्या जडणघडणेत पालकांचे योगदान महत्वाचे आहे.

 प्रेम, सेवा व सामंजस्य यासाठी देवाचे पाचारण प्रत्येकास आणुन त्यासाठी भविकांच्या अध्यात्मिक तयारीसाठी नऊ दिवस नोव्हेना भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्‍ या दिवशी पुणे येथील रे.फा. संदिप जगताप यांनी आपल्या मधुर वाणीतून संत फ्रान्सिस यांच्या कार्याची माहिती सांगितली. यावेळी या यात्रेसाठी परिसरातील भाविकांनी हजेरी लावली. हा उत्सव पार पाडण्यासाठी स्थानिक धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मग्रामसमिती, धर्मशिक्षक यांनी मोलाचे योगदान दिले.