Breaking News

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा 8 रोजी खामगांवात


  खामगांव,(प्रतिनिधी): केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने मागील साडेचार वर्षात जनतेला विकासाच्या नावावर केवळ भुलथापा दिल्या.विश्‍वासघातकी, जुल्मी,भ्रष्ट,फेकु व फसणवीस सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय राष्टीय काँग्रेस पक्षाच्या वतीने  प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु झाली आहे.

         या जनसंघर्ष यात्रेचे शनिवार  8 डिसेंबर  रोजी खामगांव येथे आगमन होणार आहे. या जनसंघर्ष यात्रेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकूलजी वासनिक,माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लीकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे सहप्रभारी तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिषजी दुआ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा खासदार राजीव सातव विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखेपाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार तारीक अन्वर, महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नानाभाऊ पटोले,महाराष्ट महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड.चारुलता टोकस,महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  सत्यजीत तांबे,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिसनजी ओझा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजयजी राठोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोंद्रे,माजी आमदार आशिष देशमुख यांच्यासह जिल्हयातील काँग्रेस पक्षाचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.