Breaking News

काकडे विद्यालयात श्रमसंस्कार शिबीर पत्रकार एक समाजसेवक आहे - तहकिक


भाविनिमगाव/प्रतिनिधी
रासेयो शिबिरातील उपक्रमशील श्रमसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांना अनुभवाची शिदोरी मिळते तर स्वविकास घडण्यासाठी मदत होते. शैक्षणिक क्षेत्रात जसे शिक्षकांचे महत्त्व आहे तसेच पत्रकार समाजाचा खूप महत्त्वाचा घटक असलेला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला आणि कुठलाही स्वार्थ न पाहता समाजाची सेवा करणारा. चांगल्या पद्धतीने वृत्त संकलन करून लोकांपर्यत चांगल्या प्रकारे बातम्या पोहचवणारा पत्रकार एक समाजसेवकच असे प्रतिपादन पत्रकार किरण तहकीक यांनी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आबासाहेब काकडे महाविद्यालय बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ भारत अभियान आणि सक्षम युवा समर्थ भारत या दोन्ही उपक्रमाांतर्गत तालुक्यातील शेकटे बु. येथे श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये युवा सबलीकरण, आरोग्य व अंधश्रद्धा जागृती, स्वच्छ भारत अभियान प्रसार, जलसंवर्धन प्रसार, वृक्ष संवर्धन प्रचार, व प्रसार, महिला सक्षमीकरत असे उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच हागणदारी मुक्त गाव, स्वच्छतेकडुन समृद्धीकडे, जलयुक्त शिवार अभियान, आधी केले मग सांगितले, लोकशाही व पत्रकारीता, तरुणांपुढील आव्हाने अशा विविध प्रकारच्या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. आज सोमवार दुपारच्या सत्रात पत्रकार एक समाजसेवक या विषयांवर लाडजळगाव येथील युवा पत्रकार किरण तहकीक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहकिक यांनी लोकशाही व पत्रकारिता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.एम. के. फसले, कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन लोंढे, प्रा. सुनील आढाव, मोनिका खेडकर व धनश्री लोंढे, गावचे सरपंच, उपसरपंच, व ग्रामस्थ आणि शिबिरार्थी विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश कुर्हे यांनी केले तर राजश्री ढेसले यांनी आभार मानले.