शेवगाव येथील युवतीची गळाफास घेऊन आत्महत्या.


शेवगाव/प्रतिनिधी
शिक्षणासाठी शेवगाव येथे भाड्याची खोली घेऊन रहात असलेल्या मुंगी येथील अकरावीच्या विद्यार्थिनीने दि. 29 रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही .पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पोलिस उपनिरीक्षक भरत काळे तपास करत आहेत . यासंदर्भात नवाब कादर शेख रा.शेवगाव विद्यानगर यांनी शेवगाव पोलिसात अर्ज देऊन घटनेची माहिती दिली आहे. दिपाली सुखदेव ठोंबरे वय 16 .इ 11 वी हे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती अर्चना सुधाकर हिंगे व रिजवाना मीर साहब बेग या एसटीच्या कार्यालयात काम करणार्‍या दोन मुली समवेत भाडेकरू म्हणून शेख यांच्या खोलीत राहत होती. 

सकाळी 8.45 वाजता शेख दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर पडले होते . तर अर्चना हिंगे व रिजवाना बेग याही कामावर गेल्या होत्या. खोलीत दिपाली ठोंबरे एकटीच होती साडेनऊच्या सुमारास ऋतुजा उद्धव नरवडे ही तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली तेव्हा दिपाली पंख्याला ओढणीने गळफास घेऊन लटकली तिला आढळली. तिने आरडाओरड केल्यानंतर दिपालीने आत्महत्या केल्याचे समजले. शेख यांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार भाऊसाहेब गिरी यांनी नोंद घेतली. सपोनि नितीन मगर यांनी दिपालीच्या वडिलांना बोलावून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुगणालयात हालविण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget