राष्ट्रवादीशी युती नाही, नाही, म्हणजे नाही... देवेंद्र फडणवीस यांचा जूना व्हिडिओ व्हायरल, नगरकरांमध्ये संभ्रम

अहमदनगर/प्रतिनिधी

मनपाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तेची गणिते जुळविण्यासाठी प्रत्येकाने व्यूहरचना सुरु केली आहे. भाजपाने शिवसेनेला सत्तेपासून दु


र ठेवण्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा सद्या नगरमध्ये चांगलीच रंगली आहे. मात्र, अशातच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काहीही झाले तरी, राष्ट्रवादीशी युती नाही, नाही, नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे शिवसेना व भाजप यांच्यात मनोमिलन झाल्याचे अनेकांना वाटत आहे. मात्र, व्हिडिओ गेल्या काही वर्षापुर्वीचा आहे. त्याचा व नगर मनपा निवडणुकीचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरच्या महापालिका निवडणुकीमुळे सगळी राजकीय खळबळ माजली आहे. कोणी सत्ता स्थापन करण्यासाठी आटापिटा करीत आहे. तर कोणी राजकीय द्वेशातून सत्ताधार्‍यांना पायउतार करण्यासाठी धडपडत आहे. नगरचे राजकारण म्हणजे सद्यातरी धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय असे झाले आहे. त्यामुळे मनपात सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सद्यातरी शिवसेना सत्तेची दावेदार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर राष्ट्रवादीनेदेखील सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. या दोन्हींच्या हेव्यादाव्यात भाजपाची भूमिका ही किंगमेकरची असणार आहे. खा. गांधी ज्याबाजूने कौल देतील किंवा देवेंद्र फडणवीस यांचा आदेश ज्या पार्ड्यात पडले तो सत्तेचा दावेदार असणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी युती पक्की आहे. त्यामुळे भाजप अलिप्त राहीली तर शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी पुरे आहे. मात्र, बसपाचे चार नगरसेवक हे शिवसेनेच्यात गोटात आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजपने अलिप्ततेचे धोरण स्विकारले तर वादग्रस्त छिंदमला देखील महत्व येणार आहे.

काही झाले तरी, नगरमध्ये भाजप व शिवसेना असा वाद असला तरी राज्यात दोन्ही पक्ष सत्ताधारी आहे. तुझे माझे जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी गत दोघांची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर येथे युती होण्याची चिन्हे स्पष्ट आहे. महापौर शिवसेनेचा व उपमहापौर भाजपचा तर समित्यांमध्ये योग्यत्या वाटघाटी करून पुन्हा दोन्ही पक्ष सत्तेत बसणार हे चित्र नगरमध्ये पहावयास मिळणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहे. त्यासाठी गटनोेंदणी करा. मग पुढचे पुढे सांगतो. अशी सुचना त्यांनी केली आहे. ते केवळ भाजप शरण आले पाहीजे. याची वाट पाहत आहेत.

अर्थात सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा आत्ताचा नसला तरी तो वास्तव संदेश देणार आहे. नगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीशी युती करणार नाही, नाही, नाही, म्हणजे नाही. हे स्पष्ट आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमुळे संभ्रमात पडलेल्या नगरकरांना येणार्‍या काळात हेच चित्र पहावयास मिळणार आहे.

ही घुसखोरी थांबली नाही तर....

भाजपला राज्यात स्वत:चे बळ कायम ठेवायचे असेल तर राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच महत्वाचा अजेंडा पाळावा लागणार आहे. अन्यथा दोन्ही पक्षांची ही घुसखोरी येणार्‍या काळात भाजपला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाच राज्यांच्या निकालाने स्पष्ट करुन दिले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget