मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, अजित पवार यांनी बजावले; साहेबांना पंतप्रधान म्हणू नका


बारामती (प्रतिनिधी)- आघाडी सरकारमध्ये अधिक आक्रमक बनून काँग्रेसशी काडीमोड घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने मागील विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवल्याने राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे वेळीच सावध झालेल्या अजित पवार यांनी अतिमहत्वाकांक्षी न बनण्याचा सूचक इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या कार्यकर्त्यांना खुद्द अजित पवार यांनीच मला भावी मुख्यमंत्री म्हणून नका, अथवा पवारसाहेबांना भावी पंतप्रधान संबोधू नका, असे बजावले आहे. 
पणदरे (ता.बारामती) येथे एका खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, की 
काही नेतेमंडळींच्या डोळ्यात राष्ट्रवादीचे यश खुपते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जागा निवडून आल्यावर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करतील, असे वाटून मित्रपक्षाकडून पाडापाडीच राजकारण होते. आपले जमिनीवर पाय ठेवून पुढे गेलेले बरे. पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच बहुमतात आणण्याचा प्रयत्न करू. भाजप-शिवसेना सत्तेतून बाहेर काढणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यात बिकट परिस्थिती आहे; मात्र त्यावर थातूर-मातूर उत्तरे देऊन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी निवडणुका जवळ आल्यावर शिवसेनला प्रभुरामचंद्र आठवतात, तर भाजप हनुमंतरायाची जात काढते, अशी टीका त्यांनी केली. 
पाच राज्यांतील भाजपचा पराभव भरून काढण्यासाठी आपण मोठी कर्जमाफी करत असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. हा केवळ निवडणुकीत मत मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहेत, अशी टीका अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षाना बरोबर घेईल. भाजप- शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांचा पराभव हेच ध्येय समोर ठेवावे. शिवसेना-भाजपसोबत असताना विरोधीपक्षाची भूमिका घेतात. शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणतात, आमची पंचवीस वर्षे सडली. मग, शिवसेना भाजपसोबत कशी काय युती करते. शिवसेनेचे हे दुटप्पी राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget