Breaking News

क्षुल्लक कारणावरून तरुणाचे डोके फोडले


बीड, (प्रतिनिधी)- समोर गाडी उभी करून विनाकारण रेस करणारास अडविल्याने रागात येऊन त्याने अन्य सात जणांच्या साह्याने दोघा जणांना लोखंडी गज, काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बीड मधील शाहूनगर येथे रविवारी रात्री घडली. या मारहाणीत एका युवकाचे डोके फुटले आहे.

विशाल संजय शेळके आणि त्याचा मित्र श्रीकांत दत्तु काशिद हे दोघेजण रविवारी रात्री ९ वाजता शाहूनगर मधील कॅनल समोर बसले होते. यावेळी शाहनवाज खान (रा. अजमेरनगर) हा तिथे आला आणि मोटारसायकल थांबवून जोरजोरात रेस करू लागला. त्यामुळे विशालने त्याला इथे रेस करू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने शाहनवाजने अन्य सात जणांना तिथे घेऊन आला. त्या सर्वांनी विशाल आणि श्रीकांतला लोखंडी गज आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गज लागल्याने विशालचे डोके फुटून टाके पडले आहेत. त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आठ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.