Breaking News

मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारणार : खा. डॉ. विकास महात्मे


बिदाल (प्रतिनिधी) : राजे मल्हाराव होळकर यांच्या जन्मगावी आल्यानंतर मला चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम केले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून होळ-मुरूम, ता फलटण येथे राजे मल्हाराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारणार आहे, असे मत पद्मश्री डॉक्टर खासदार विकास महात्मे यांनी केले. होळ-मरुम भेटीदरम्यान बोलत होते.

खा. महात्मे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या सरकारने जाहीरनामा व आश्‍वासनाचे पालन केले नाही. शिवसेनेच्या प्रमुख उध्दव ठाकरे यांना राम मंदिर महत्त्वाचे वाटते पण महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो व मेंढपाळ बांधवावर होणारे अन्याय मात्र दिसत नाही. भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या विरोधात 20 जानेवारी रोजी वाशिम येथे धनगर आरक्षण आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन खासदार विकास महात्मे यांनी केले.
यावेळी बापूसाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, दादासाहेब हुलगे, अँड प्रशांत रुपनवर, माजी पंचायत समिती सभापती शंकराव मारकड साहेब सामाजिक कार्यकर्ते संतोष ठोंबरे, योगेश कोळेकर, धनाजी सरक, नागेश कोळेकर, मुरुमचे सरपंच खोमणे, नारायण बोंद्रे आदी उपस्थित होते.