Breaking News

मुदतीआधीच उडणार निवडणुकांचा बार?

युती सरकारनं गेल्या काही दिवसात केलेल्या महत्वपूर्ण घोषणा आणि आगामी लोकसभा निवडणूक पाहता राज्यातही मुदतपूर्व निवडणूक लागण्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारीच्या अधिवेशनानंतर विधानसभा विसर्जित करण्याची सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली जाणारी राजस्थान , मध्यप्रदेश आणि छत्तीसगडची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. पण याच दरम्यान भाजप लोकसभेबरोबर सात राज्यांच्या निवडणुकांच्या तयारीला लागल्याची माहिती आहे.