Breaking News

ट्रॅक्टर खड्ड्यात गेले; एक ठार


पाटोदा, (प्रतिनिधी)- करमाळा येथील कारखान्यावरून ताम्बाराजुरी येथे उसतोडणी साठी जाणार्‍या ट्रॅक्टरचा रविवारी रात्री १० वाजता सौताड्या नजीक चालकाचा ताबा सुटून खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शेषेराव घुमरे व दत्ता तांबे (रा. तांबा राजुरी) हे दोघे जन आपल्या गावातील उसतोडण्यासाठी करमाळा येथील कारखान्यावरून ट्रॅक्टर (एम.एच.२३ एजे ११०७) मध्ये निघाले होते. यावेळी त्यांच्याच गावातील धनंजय शिंदे हा पिक विमा भरण्यासाठी म्हणून गावाकडे जाण्यासाठी त्यांच्या सोबत निघाला. दरम्यान आपल्या गावी जात असताना तालुक्यातील सौताडा नजीक ट्रक्टर चालक दत्ता तांबे यांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात झाला. 

यामध्ये धनंजय शिंदे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी धनंजयचा मृत्यू झाला हे पाहताच चालक दत्ता शिंदे याने घटनास्थळाहून पळ काढला. याबाबत शेषेराव घुमरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार चालक दत्ता तांबे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.