उद्योगपतींचे कर्जे माफ होतात, तर शेतकर्‍यांची का नाहीत? - कमलनाथ


नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक प्रचाराद दरम्यान काँग्रेसने सत्ता आल्यानंतर दहा दिवसांच्या आत शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार असल्याचे म्हटले होते. शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांना एका मुलाखतीत शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर विचारण्यात आले. यावेळी त्यांनी उलट प्रश्‍न केला, की उद्योगपतींचे कर्ज माफ होते, तर मग शेतकर्‍यांचे कर्ज का माफ होत नाही?
शेतकर्‍यांची कर्जमाफी अर्थव्यवस्थेसाठी चांगला पर्याय आहे का, या प्रश्‍नावर कमलनाथ म्हणाले, की शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे ही काँग्रेस सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. इंटरनेटवरून बँकांची माहिती घेतल्यास लक्षात येते, की  कशा पद्धतीने उद्योगपतींचे 40 ते 50 टक्के कर्ज माफ केले आहे. आपण मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करू शकतो. मग, असे धोरण शेतीसाठी का नाही? शेतकर्‍यांचा जन्मच कर्जात होतो व त्याचे संपूर्ण आयुष्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाते. शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे गरजेचे आहे. मध्य प्रदेश अर्थव्यवस्थेचा पाया पैसा नसून येथील जनता आहे. 
यावेळी कमलताथ म्हणाले, की मी वाणिज्य मंत्री म्हणून कामकाज पाहिल्याने अर्थव्यवस्था कशी चालते याची मला जाण आहे. राज्यातील 70 टक्के लोकांचे जीवन शेतीवर आधारित आहे. केवळ शेतकरीच नाही तर, असे लोक आहे जे ट्रॅक्टर चालवतात, शेतीत रोजगारीची कामे करतात. सर्वांना रोजगार शेतीतूनच मिळतो. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget