Breaking News

शिक्षक आघाडी सहविचार सभा संपन्न


 बुलडाणा,(प्रतिनिधी): येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात 4 डिसेंबर रोजी शिक्षक आघाडीची सहविचार साभा शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सहविचार सोमध्ये 1 व 2 जुलै रोजी घोषीत शाळेचे विनाअनुदानीत काळातील व्यवसाय करारासंदर्भात थांबविलेले वेतन देयकाबाबत शिक्षणाधिकारी डॉ.श्रीराम पानझाडे यांना विचारणा केली. यावर विनाअनुदानीत काळातील वेतन संस्थेने शिक्षकांच्या खात्यात जमा केले किंवा नाही याची शहानिशा करुन जबाबदारी आ.श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत आज सध्या स्थितीत असणार्‍या वेतनातील व्यवसाय कर कपात करुन वेतन अदा करण्याचे सुचविले.

 सध्या कुणाचेही नियमीत वेतन देयक या कारणामुळे थांबविले जाणार नाहीत, असे आश्‍वासन शिक्षकांना देण्यात आले. तसेच 23/10/2017 पुर्वीचे निवड श्रेणीचे प्रस्ताव अनेक दिवसापासून प्रलंबीत असल्याने त्वरित प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयास स्विकारावेत, संबधीत शिक्षकास निवड श्रेणीचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासह 1 नोव्हेंबर 2005 पुर्वीच्या शिक्षकांचे जि.पी.एफ. खाते सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी सदर प्रकरणाबाबत आम्ही अभियोक्ता सरकारी वकील  यांना याबाबत मार्गदर्शन मागीतले असुन लवकरच नवीन  खाते उघडण्यात येतील असे मत मांडले.