Breaking News

कोरेगाव भीमासाठी तयारी सुरू; प्रशासन दक्ष


पुणे (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात 1 जानेवारी 2019 रोजी होणार्‍या विविध कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकार्‍यांची पेरणे फाटा येथे बैठक पार पडली. गेल्या वर्षी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी प्रशासनाने सतर्क राहत मोठी तयारी केली आहे.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, पीएमपीएमल, विद्युत विभाग, महसूल, पोलिस यंत्रणा आदी अनेक विभागातील प्रमुख उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी राम व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना नियोजनासंदर्भातील विविध सूचना दिल्या.