सत्तेचे काही महिने उरले असताना घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्याचा दिखावा करणारे सरकार निष्क्रीय -अ‍ॅड.गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- घरकुल वंचितांसाठी साडे चार वर्षापुर्वी घोषणा करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी शेवटी राज्य सरकारने लॅण्ड पुलिंगचा आधार घेतला असून, नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे-महाळुंगे येथे माण हायटेक सिटी निर्माणाची पायाभरणी केली आहे. मात्र घरकुल वंचितांना हा आश्‍वासनाचा गाजर असून, ही बाब तीन वर्षापुर्वीच करणे आवश्यक होती.


संघटनेने वेळोवेळी हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकार अकार्यक्षम असून त्यांना वंचितांच्या प्रश्‍नाची आस्था नसल्याचा आरोप मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे.

घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहेत. तर पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत होण्यासाठी चीन, जपान व कोरीया या राष्ट्रांच्या धर्तीवर हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना महाराष्ट्रात राबविण्याची मागणी सातत्याने संघटनेने केली होती. यासाठी केंद्र व राज्य सरकार स्तरावर पाठपुरावा करुन अनेक आंदोलने करण्यात आली. या योजनेद्वारे सरकारला जमीनीचे भूसंपादन करावे लागणार नाही. या प्रकल्पासाठी खडकाळ जमीन उपलब्ध करुन देणार्‍या शेतकर्‍यांना विकसीत जमीनीचा निम्मा हिस्सा मुळ शेतकर्‍यांना परत करावयाचा होता. सरकारला फक्त तेथे मुलभूत सुविधा निर्माण करायचे होते. या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरकुले मिळणार होती.

 सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करुन घरकुल वंचितांना झुळवत ठेवले. शेवटी ही योजना म्हाडा कडे वर्ग करण्यात आली. त्यांच्याकडून देखील काम होत नसल्याने स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. तर शेवटी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून पुणे-महाळुंगे येथे माण हायटेक सिटी निर्माणाची पायाभरणी केली जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुक एकत्रित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्तेचे काही महिने उरले असताना घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्याचे दिखावा करणारे सरकार निष्क्रीय असल्याचे प्रसिध्दीपत्रकात अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

नगर शहराच्या एमआयडीसी लगत असलेल्या गावातील शेतकरी खडकाळ जमीनी या प्रकल्पासाठी देण्यास तयार आहेत. तर अनेकवर्षापासून पड असलेली कृषी विभागाची पंम्पिंग स्टेशन येथील जमीन घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी मिळाल्यास घरकुल वंचितांच्या घरांचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget