नवीन महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ संपूर्ण महाराष्ट्रात लागूबीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, १९४८ हा अधिनियम शासनाने निरस्त करून नवीन महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ हा अमलात आणला आहे.

 हे अधिनियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून यामध्ये शहरातील एम.आय.डीसी. भागातील व ग्रामीण भागातील दुकाने, निवाशी हॉटेल, धाबा, उपहारगृह, खाद्यगृह, थिएटर किंवा सार्वजनिक मनोरंजनाची जागा स्थापना, कोणतेही उद्योग, उत्पादन कार्य किंवा बँकीग, विमा रोखे व भाग (शेअर्स) दलाली किंवा उत्पन्न विनियम याबाबतचा व्यवसाय किंवा पेशा अथवा कोणताही धंदा उद्दीम किंवा उत्पादन कार्य यांच्याशी संबंधित किंवा त्यास अनुषंगिक अथवा सहाय्यभूत असे कोणतेही काम करणारी आस्थापना, वैद्यक व्यवसायी (हॉस्पिटल, दवाखाना, चिकित्सालय प्रसतीगृह) वास्तुशास्त्राच्या, अभियंत्याच्या सल्लागाराच्या आस्थापना, सोसायटी व तिच्याशी अनुषंगिक किंवा सहाय्यभूत असलेला कोणताही धंदा, उद्दीम किंवा व्यवसाय तसेच ज्यांना कारखाने अधिनियम १९८४ यांच्या तरतुदी लागू होत नाहीत. 

त्या सर्व आस्थापनाचा समावेश होता. यासंदर्भात ज्यांच्याकडे दहापेक्षा कमी कर्मचारी काम करत असणार्‍या आस्थापना मालकांना अधिनियमच्या प्रारंभाच्या १९ डिसेंबर २०१७ पासून आस्थापनेने व्यवसाय सुरु केल्याच्या दिनांकापासून ६० दिवसाच्या आत विहीत नमुन्यत आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून, सूचना पत्राची पावती प्राप्त करून घ्यावी तसेच ज्या आस्थापनेत दहा किंवा त्यापैक्षा जास्त कामगार काम करतात त्या आस्थापना मालकांनी अधिनियमाच्या कलम ६ च्या तरतुदीनुसार नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व व्यवसायधारकांनी सदर अधिनियमांतर्गत आपल्या आस्थापनेची रीतसर नोंदणी करून सूचना पत्राची पावती अथवा नोंदणी प्रमाणपत्र नि:शुल्क प्राप्त करून घ्यावे. अर्ज संबधित आस्थापनाधारक स्वत: ऑनलाईन किंवा ग्राहक सेवा केंद्राद्यारे (सेतूद्वारे) भरू शकतो, याची नोंद जिल्ह्यातील सर्व आस्थापना धारकांनी घ्यावी जेणेकरुन कुठल्याही प्रकारे त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक होणार नाही, असएस. पी.राजपूत, सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी कळविले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget