जायकवाडी जलाशयात पक्षांचा स्वच्छंदी विहार.शंकर मरकड 
भाविनिमगाव/प्रतिनिधी
                पावसाळ्यानंतर जशी थंडीची हळूहळू चाहूल लागते त्याचबरोबर जायकवाडी निसर्ग सौंदर्य जलाशयात विविध प्रकारच्या स्वदेशी - परदेशी पक्षाच्या आगमनाची सुरुवात होते. हजारो पक्षांचे थवेच्या थवे जलाशयाच्या कडेने स्वच्छंदी मुक्त विहार करत या निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी आपल्या सवंगड्या सोबत जणू हिवाळी सहलच साजरी करतायेत असे दृश्य आज आहे. त्याचबरोबर पक्षी प्रेमींचीही या परिसरात गर्दी वाढू लागली आहे. हजारो परदेशी व स्वदेशी पक्षांचे निरीक्षण एकाच ठिकाणी पक्षी प्रेमींना करण्याची संधी मिळत असल्याने पक्षी निरीक्षणाचे  मुख्य ठिकाण म्हणून जायकवाडी विस्तीर्ण जलाशयाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. हिवाळा ऋतुची चाहूल जशी बोचर्‍या थंडीने होते तसा शेतकरी आपल्या रब्बी हंगामाची सुरवात करतो तसेच पक्षीही आपल्या विणीच्या हंगामासाठी या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात आणि विणिसाठी विस्तीर्ण विषेशतहा पाणथळ जागेची निवड पक्षी करत असतात. आणि विस्तीर्ण व पाणथळ जलाशय असलेल्या जायकवाडी नाथसागर धरण पैठण जलाशय स्वदेशी व परदेशी पक्षांचे विणिसाठीचे आवडते ठिकाण. जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण जलाशय यातील गोडे पाणी त्यात निर्माण होणारे व पक्षाचे खाद्य असलेले शेवाळाचे जास्तचे प्रमाण जवळपास 70 प्रकारचे मासे इतर छोटे मोठे जिव जंतू पक्षांना या हंगामात मोठ्या प्रमाणात खाद्य म्हणून या जलाशयात उपलब्ध होत असल्याने परदेशी पक्षांचे आगमण या जलाशयात नित्य नेमाने दरवर्षी वाढत्या प्रमाणात होत असते. मुख्यत्वे अटलांटिक महासागर व शेजारील देशातील पक्षांचे आगमन येथे दरवर्षी पावसळा संपल्यावर लगेच होते. हजारो किलोमीटर अंतर पार करत फ्लेमिंगो, रोहित, कोतवाल, घार पाणकावळा, गायबगळा, चक्रवाक, शिक्रा, चित्र बलक, गॉडविट, होकाट्या या प्रमुख परदेशी पक्षाबरोबर इतर अनेक प्रजातीच्या पक्षांचे आगमन सध्या जलाशयात होत असुन जलाशयाच्या कडेला या पक्षांचे थवेच्या थवे मुक्त विहार करत आहेत. या वर्षी जलाशय बर्‍यापैकी भरलेला असल्याने या परिसरात पक्षांची चांगलीच चिवचिवाट वाढलेली दिसतेय. जलाशय कडेला यंदा बर्‍यापैकी गाळपेर झाली असून जलाशयातील ऊपलब्ध मासे, इतर किडावरगिय जिवजंतु बरोबर रब्बी हंगामातील पिके या खाद्यावरच आपली गुजरान करतात.

प्रतिक्रिया  
जायकवाडी या विस्तीर्ण जलाशय व शांत प्रदेशाच्या परिसरात सध्या विविध जातीच्या पक्षांचे आगमन होऊन पक्षांचा मुक्त विहार चालू आहे. आजच्या घडीला या परिसरात पक्षांचा चिवचिवाट तर रंगीबेरंगी पक्षांची थवे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व अनेक ठिकाणच्या शालेय सहलीच्या आगमनाने हा जलाशय नागरिकांचे आवडते पर्यटन ठिकाण होत आहे.       
सोपान जाधव पक्षीप्रेमी भाविनिमगाव

प्रतिक्रिया.. 
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या गोड्या पाण्याच्या जलाशयात शेकडो जातीच्या पक्षांचे हजारो थवे लाखांची संख्या असलेल्या रंगीबेरंगी पक्षाच्या आगमनाने या परिसराचे रूपच पालटून जात असुन जलाशयाच्या चोहो बाजुच्या काठावर विविध पिक व झाडाझुडपाच्या हिरवाईने तर रंगीबेरंगी पक्षाच्या वास्तव्याने परिसर सप्तरंगी बनला असुन पक्षिनिरीक्षणाचा एक वेगळाच आनंद मिळतो आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget