Breaking News

पोवई नाक्यावरील वडाच्या झाडाच्या फांद्या छाटल्या


सातारा, (प्रतिनिधी) : सातारा शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामांना चांगलीच गती मिळाली आहे. मात्र, हे रुंदीकरणाचे काम करताना कामात अडथळा निर्माण करणार्‍या अनेक झाडांवर सध्या कुर्‍हाड फिरवली जात आहे. 

सातार्‍यात पोवई नाका येथील ग्रेडसेपरेटरचे काम आता कराड बाजूने सुरू होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीलगत असणार्‍या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या आहे. फांद्या तोडत असताना काही काळ सातारकरांना वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. अगोदरच शहरात चालू असणार्‍या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, या रुंदीकरणाच्या कामात जी झाडे तोडली जात आहेत. त्यांच्याजागी दुसरी झाडे लावली जावीत, अशी मागणीही नागरीकांसह पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषद कार्यालयालगतच्या रस्त्याच्या दूतर्फा असणारी वाहनेही रस्त्याच्या कामावेळी तोडण्यात आली. मात्र, अजूनही त्यांच्याजागी नव्याने वृक्षारोपण करण्यात आलेले नाही.