Breaking News

जनावरांच्या दावणीला चारा द्या म्हणत माकपचा माजलगावमध्ये मोर्चा


माजलगाव, (प्रतिनिधी):-दुष्काळामध्ये शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई सह , जनावरांच्या दावणीला चारा व पाण्याची सोया करा यासह इतर मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी रोजी माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयवर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती मोट्या प्रमाणात होती.

तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तुर, बाजरी, मुग यासह सर्व पिकं पावसाअभावी करपुन गेले आहेत. गुराढोरांचा चारा पाण्याचा प्रश्न खुप गंभीर झाला आहे. शासनाने दुष्काळ घोषित करून ही काही उपाय योजन केलेले नाहीत त्या मुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सूरू करा, शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकर्‍यांच्या जनावराना छावणी ऐवजी दावणीला चारा देण्यात यावा, गरीब व अल्पभूधारक शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतकर्‍यांना नव्यान कर्ज पुरवठा करा, रेशन धान्यात होत असलेली कपात बंद करा, शेतकर्‍यांचे कृषि पंपाचे विज बिल माफ करा इत्यादी मागण्या साठी बुधवारी रोजी दुपारी माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालवर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर किसान पुत्र,तसेच मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. मोरचे करांनी रस्त्याने सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आपल्या मागण्या लावून धरल्या. 

दरम्यान मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जी.झम्पलवाड यांच्या कडे सादर करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.दत्ता डाके, तालुकासचिव कॉ बाबा सर, सय्यद याकूब संदीपान तेलगड, मोहन जाधव, विनायक चव्हाण, बळीराम भुम्बे, सुहास झोड़गे, शिवाजी कुरे, भगवान पवार,सुभाष थोरात, सुभाष डाके, सय्यद रज्जाक, नारायण तातोड़े, सुखदेव घुले, जनक तेलगड, रामभाऊ राऊत, ई.प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते