Breaking News

जनसंघर्ष यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागाी व्हा : आ.राहुल बोंद्रे चिखली,(प्रतिनिधी): काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्र बुलडाणा जिल्हयात मेहकर, सिंदखेड राजा, बुलडाणा येथे येत असून  चिखली येथे 9 डिसेंबर रोजी यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमासाठी मोठया संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.राहुल बोंद्रे यांनी केले. ते जनसंघर्ष यात्रे निमित्त अयोजित नियोजन सभेत बोलत होते.

चिखली  येथील बाजार समितीच्या सभागृहात आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या नियोजन सभेत प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, माजी आमदार बाबुराव पाटील, पक्षनेते लक्ष्मणराव घुमरे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र हारलालका, सुधाकर धमक, जयश्रीताई शेळके, अनिताताई रणबावरे, मिनलताई आंबेकर, प्रकाश धुमाळ, स्वातीताई पर्‍हाड, नंदुभाउ बोरेे, समाधान सुपेकर, अनंत वानखेडे, संजय पांढरे, सतिश मेहेद्रे, सुनिल सपकाळ, डॉ.मोहमंद इसरार, जाकीर कुरेशी, दिपक खरात, रामभाउ जाधव, वसंतराव देशमुख, नाजेर काझी, सत्यजित खरात, राजेश मापारी, शिवदास रिंढे, देवानंद पवार, दिलीप सानप, सुनिल तायडे, दत्ता काकस, नंदु शिंदे, लांडे पाटील, गजानन खरात, साहेबराव पाटोळे, बादशहा खान, विष्णु पाटील कुळसंदर, अतहरोद्यीन काझी, विष्णुपंथ पाखरे, कलीम खान, यासीन कुरेशी, दिलीप बोरे, शेख असलम उपस्थित होते. प्रदेश काँगे्रस कमिटीने राज्यभर काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे, जनसंघर्ष यात्रेच्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारला आजपर्यंत 31 ऑक्टोंबर ला दुष्काळ जाहीर करण्याची परंपरा मोडीत काढुन 7 दिवस आगोदरच दुष्काळा जाहीर करावा लागला. हे यात्रेतून व्यक्त झालेल्या जनआक्रोषाचे यश होय.

 अशा यशस्वी यात्रेचा समारोप चिखली येथे होतो आहे, त्यामागे चिखली मतदार संघाचे आ. राहुल बोंद्रे यांचेवरील प्रदेश काँगे्रसचा विश्‍वास हे कारण असुन प्रदेश काँगे्रसच्या विश्‍वासाला अधिक बळकट करण्यासाठी घाटमाथ्यावरील सर्व काँगे्रस कार्यर्त्यांनी चिखली येथील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शाम उमाळकर यांनी केले. यावेळी लक्ष्मण घुमरे यांचेही भाषण झाले.