Breaking News

छोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटकअंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा डावा हात असलेल्या छोटा शकीलला मोठा हादरा बसला आहे. शकीलच्या भावाला अटक करण्यात आली आहे.

दुबईतील एका हाॅटेलमधून शकीलचा भाऊ अनवर बाबू शेखला पोलिसांनी अटक केली आहे. दुबई पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाच्या टीमने अनवरच्या मुसक्या आवळल्या.

छोटा शकीलच्या भावाला अटक झाल्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणेला दिलासादायक बातमी आहे. सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस दुबई पोलिसांच्या संपर्कात आहे.