Breaking News

विशाल गुजर राज्यस्तरीय शिक्षकरत्न गौरव पुरस्काराने सन्मानितधाड,(प्रतिनिधी):  बालाजी विद्यालय वालसावंगी येथील शिक्षक विशाल गुजर यांना नुकताच  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट,मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षकरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 मुंबई येथे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रा मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरम्यान विशाल गुजर यांचे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ते नेहमीच कृतिशील असतात.वेळोवेळी उपयुक्त उपक्रम घेणे,विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रकल्प राबविणे,विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. गुणवंत शिक्षक गुजर यांना कृष्णाजी जगदाळे या मान्यवरांच्या उपस्थितीत   जालना जिल्ह्यातुन  विशाल गुजर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र  देऊन राज्यस्तरीय शिक्षकरत्न गौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.