Breaking News

सोनईत स्कुल बसकडून वाहतूक नियमाची पायमल्ली


सोनई/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई सह अन्य परिसरात शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, लहान मुले-मुली यांची वाहतूक करणार्‍या बेफिकीर जीवघेणी वाहतूक सर्रास केली जात आहे. चक्क परिवहन खातेचे नियमाची पायमल्ली केली जात आहे. सोनई गावात सहा शाळा असून परिसरातून 4 ते 5 की. मी. अंतरावरून वाड्यावस्त्यावरून शालेय विद्यार्थीची वाहनातून केली जाते.

 या वाहनातून दप्तराचा काही भाग वाहनांच्या  बाहेर आलेला असल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त मुले वाहनात ने-आण करतात, सर्वत्र ठिकठिकाणी मोठी गर्दी असते, त्यामुळे पालकांना मुले शाळेत पाठवताना जीव मुठीत धरूनच पाठवावे लागते. मुले घरी येऊ पर्यंत पालक चिंतेत असल्याने परिवहन खात्याच्या नियमानुसारच मुलाची वाहतूक करणे फायदेशीर ठरेल अशी प्रतिक्रिया पालकातून केली आहे. या सर्व बाबी तपासून या वाहनांना आळा घालवा मुलांना सुरक्षित प्रवास म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
      
एल.के.जी.यू.के.जी. शाळेची संख्या मोठी असून वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. याची तपासणी करणे हे परिवहन खात्याचे कार्य असून तात्काळ पोलीस प्रशासन संबधित दिसेल त्या वाहनांना नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल.
 पो.नि.कैलास देशमाने, सोनई