आयकाँन पब्लिक स्कूलमध्ये भव्य एज्युकेशन फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद .

नगर- शिक्षणा बरोबरच मुलांचा सर्वांगीण विकासाचे व समाजिक जबाबदारीचे भान जोपासत दरवर्षी प्रमाणे शरद मुथा एज्युकेशन ट्रस्ट संचलित आयकाँन पब्लिक स्कूलमध्ये भव्य एज्युकेशन फेअर घेण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्य प्रवर्तक श्री.शरद मुथा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन श्री.अशोक मुथा,संचालक निर्मल मुथा,अमित मुथा,कर्नल आर.सी.राणा, प्राचार्या सौ.आराधना राणा सर्व शिक्षक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्राचार्या राणा म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना सामजिक भान व परिस्थितीची जाणीव व्हावी ,स्नेहालयातील मुलांशी ऋणानुबंध निर्माण व्हावेत यासाठी शैक्षणिक फेअर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला आहे. मुलांना वेगळा दृष्टीकोन मिळून नवनवीन कल्पना व संधी यामुळे उपलब्ध होत आहेत.खरे समाधान कशात आहे याची जाणीव विदयार्थ्यांना यामुळे निश्चित प्राप्त होईल.

संचालक अमित मुथा यांनी यांनी सांगितले की, नगरकरांसाठी हे शैक्षणिक फेअर हि सुवर्ण संधी असून खेळ, नवीन वैज्ञनिक उपकरणे याची माहिती व प्रत्यक्ष अनुभव येथे सगळ्यांनी घेतला. त्याच प्रमाणे येत्या २९ डिसेंबरच्या वार्षिक स्नेहसंमेलनात लाईट व म्युझिक शो हे मुख्य आकर्षण राहणार आहे.

आयकाँन पब्लिक स्कूलमध्ये आयोजित शैक्षणिक फनफेअर मध्ये विविध खेळांचे २६ स्टाँल होते. त्याच बरोबर नवनवीन पुस्तकांचे दालन, बौद्धिक विकास, म्युझिक विभाग, टेट्यु, सायन्स प्रकल्प व खाद्यपदार्थ स्टाँल हि होते.

सकाळ पासून ते फेअर संपेपर्यंत प्रत्येक तासाला उपस्थित मान्यवर, पालक व स्नेहालयातील मुलांसाठी विध्यार्थ्यांनी विविध विषयांवर पथनाट्ये सादर करून प्रबोधन केले. सायबर क्राईम, महिला सक्षमिकरण या विषया बरोबरच सध्या नगर मधील महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेले मतदानाचे महत्व सागणारे पथनाट्यने उपस्थितांची वाहवा मिळविली.

या प्रदर्शनास ६००० जणांनी सहभाग घेतला. आयकाँन पब्लिक स्कूलतर्फे स्नेहालयातील सर्व विध्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. उपक्रमाचे पालक विध्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी कौतुक करू समाधान व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget