Breaking News

कराड येथील ‘आस्था’च्या गायन स्पर्धेत किरण अडागळे विजेते

सातारा (प्रतिनिधी) : कराड येथील आस्था सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सोलो गायन स्पर्धेत खुल्या गटात सातार्‍याच्या किरण अडागळे यांनी विजेतेपद पटकावले. 

नवोदित गायकांना संधी मिळावी म्हणून आस्था सामाजिक संस्थेने जिल्हास्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सातारा, सांगली येथील महिला व पुरुष गायकांनी सहभाग घेतला होता. किरण अडागळे यांनी या स्पर्धेच्या प्रथम फेरीत सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे गाजलेले पुछो ना कैसे मैंने रैन बिताई हे अवघड गाणे सादर केले. स्पर्धत इतर फेर्‍यांमधून निवडक स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. यामध्ये अडागळे यांचा समावेश होता. अंतिम फेरीत अडागळे यांनी पुन्हा मन्ना डे याच गायकाचे अत्यंत अवघड समजले जाणारे लागा चुनरी पे दाग हे गाणे अत्यंत सहजतेने गात बाजी मारली. स्पर्धेचे परिक्षक गायक राजेंद्र दीक्षित यांच्या हस्ते किरण अडागळे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम आल्याने किरण अडागळे यांना लवकरच अल्बममध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. 
या स्पर्धेत विजेतेपद मिळाल्याबद्दल किरण अडागळे यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातार्‍याचे भाजपचे नगरसेवक मिलिंद काकडे, भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमित भिसे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी आस्थाच्या अध्यक्षा सौ. स्वाती पिसाळ, सौ. विद्या मोरे, कोरेगावच्या नगरसेविका अर्चना बर्गे, दिग्दर्शक वासू पाटील, डॉ. दिलीप सोळंकी, डॉ. सविता देवकर, डॉ. स्वाती थोरात, डॉ. फासे, डॉ. संदीप पाटील, संगीत संयोजक दीपक तडाखे, ओमकार सरोदे, वादक रोहन पवार, सुजीत गायकवाड उपस्थित होते.