Breaking News

संभाजी भिडेंंची पुनर्विचार याचिका फेटाळली; कोर्टात यावे लागणार


नाशिक (प्रतिनिधी)- तो विशिष्ट आंबा खाल्ला, की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती होते, या विधानावर संभाजी भिडे यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. आंबे खाल्याने मुले होतात असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर भिडे यांच्या विरोधात महापालिकेने याचिका दाखल केली होती.

भिडे हे सलग तीन तारखांना सुनावणीस गैरहजर होते. त्यामुळे पुढील तारखेला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भिडे हजर झाले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढणार असल्याचे सांगण्यात आले. मी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनुबरोबर तुलना केली नाही. माझे भाषण नीट समजून घ्या. राजस्थान उच्च न्यायालयासमोर मनुचा पुतळा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुचे कौतुक केले होते, हा इतिहास आहे. ते ताज्य आहे तेवढेच घ्यायचे आणि बाकी सगळे टाकून द्यायचे असे सगळे सुरू आहे. राज्यघटनेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे, असे म्हणणे भिडेंनी मांडले आहे. वारीची माझ्या घराण्यातली 13वी पिढी आहे. मला वारीत अशांतता निर्माण करायची नव्हती आणि नाही. आमचा वारकरी तसा नाही. केवळ काही लोक अपप्रचार करत आहेत. राजाभाऊ चोपदारांनीही माझी भूमिका समजून घेतली आहे, असा त्यांचा दावा आहे.