Breaking News

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रूग्णाचा मृत्यू - नातेवाईकांचा आरोपशिर्डी /प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील वाळकी येथील पोपट फकीरा गोसावी यांचा अपघात  होऊन त्यांना श्री साईनाथ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असुन सबंधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी आणि मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी रुग्णालयाच्या प्रवेश द्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
पोपट गोसावी हे संस्थान कर्मचारी असुन त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याचे आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी संतप्त नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान साईनाथ सुपरस्पेशालिटी रुग्णालया समोर नातेवाईकांनी मोठी गर्दी करत जोपर्यंत मयताच्या कुटुंबातील एकास संस्थानमध्ये नोकरी द्यावी. आणि तसे लेखी द्यावे. अशी मागणी केली. यावेळी साईबाबा मंदिर सुरक्षा प्रमुख आनंद भुईटे यांनी योग्य ती चौकशी करुन यात डॉक्टर दोषी आढळल्यास कारवाई होईल. असे आश्‍वासन नातेवाईकांना दिले. संतप्त नातेवाईकांच्या भावना लक्षात घेऊन शिर्डीतील माजी उपनगराध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, विठ्ठल पवार, प्रमोद लबडे, यांनी मध्यस्थी करत मयताच्या नातेवाईकांना न्याय मिळेल अशी भुमिका घेत नातेवाईकांना शांत केले. प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पो.नि.अरविंद माने यांनी साईनाथ रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवला आणि नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले.