Breaking News

मत्रेवाडीतील आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानीढेबेवाडी, (प्रतिनिधी) : मत्रेवाडी (ता.पाटण) येथील आठ घरे बुधवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाली. आगीच्या रौद्ररुपात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आठ कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील मत्रेवाडी येथे बुधवार (दि. 5) रोजी मध्यरात्री अडीच वाजता शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये भगवान बापू मत्रे, लक्ष्मण रामचंद्र मत्रे, शामराव रामचंद्र मत्रे, रमेश विठ्ठल मत्रे, संजय बाळकू मत्रे, लक्ष्मण खाशाबा मत्रे, सुरेश विठ्ठल मत्रे या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचा संपूर्ण संसार आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे.

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.