Breaking News

अहमदनगर महाविद्याचे डॉ.नंदकुमार सोमवंशी यांची सा.फु.पुणे विद्यापीठ अ.नगर उपकेंद्राच्या संचालकपदी निवडनगर - अहमदनगर महाविद्यालयातील चिफ कोऑर्डिनेटर, नॉन ग्रांट कोर्सेस डॉ.नंदकुमार आर.सोमवंशी यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ अहमदनगर उपकेंद्राच्या संचालकपदी निवड करण्यात आली. हि निवड एकावर्षा करीता आहे. 
 
डॉ.नंदकुमार सोमवंशी यांनी नॉन ग्रांट कोर्सेस, हेड डिपार्टमेंट ऑफ झुलॉजि, कोऑर्डीनेटर, बायोटेकनॉलॉजी या व अनेक मुख्यपदांवर उत्तम कामगिरी केली. यासर्व कामगिरीची दखल घेवुन हि निवड करण्यात आली. डॉ.नंदकुमार सोमवंशी यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे उपक्रेंदाच्या संचालकपदी निवड हि महाविद्यालयाची एक महत्वाची कामगिरी आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.कमलाकर भट, प्रो.बी.एम.गायकर, डॉ.अरविंद नागवडे, डॉ.डी.बी.मोरे आदी उपस्थित होते.