Breaking News

मुलभूत सुविधांसाठी आपचे उमेदवार विजय करा -अ‍ॅड. जावेद काझी


अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या पंचवीस वर्षापासून नगरकरांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. आलटून-पालटून सत्तेचा उपभोग घेऊन जनतेला फसविण्याचे काम प्रस्थापितांनी केले. हे बदलायचे असेल तर आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.जावेद काझी यांनी केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मार्केटयार्ड येथील महात्मा फुले चौकात परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या समारोपीय प्रचार सभेत अ‍ॅड.काझी बोलत होते. यावेळी भारतीय देशभक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी डमाळे, प्रवक्ते मेजर रावसाहेब काळे, आपचे उमेदवार जयश्री शिंदे (प्रभाग क्र.14 क), सुभेदार भाऊसाहेब आंधळे (प्रभाग क्र.2 ड), सागर अलचेट्टी (प्रभाग क्र.4 ड), दिलीप घुले (प्रभाग क्र.5 अ), योगेश खेंडके, रजनी ताठे, आपचे किरण उपकारे, संपत मोरे, राजेंद्र कर्डिले, अ‍ॅड.महेश शिंदे, रत्नमाला शिंदे, रेखा नगरे, नयना बनकर, सुधाकर वाघमारे, नानी वाघमारे, दिनेश शिंदे, ओंकार वाघ, संदेश पाटोळे, डॅनियल पठारे, संतोष धीवर, मिलिंद डंबे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अ‍ॅड.काझी म्हणाले की, दिल्लीच्या धर्तीवर आम आदमी पार्टीचे केजी ते पीजीपर्यंत मोफत आंतराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, वीज बिलात 50 टक्के सवलत, प्रत्येक प्रभागात आरोग्य सेवा केंद्र, शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता नगरमध्ये निर्माण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय देशभर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी ढमाळे म्हणाले की, जयश्रीताई शिंदे या झाशीच्या राणी प्रमाणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

 समाजकार्याच्या जोरावर त्यांचा सारसनगर, भवानीनगर, बुरुडगाव रोड, विनायक नगर येथील नागरिकांचा वाढता प्रतिसाद त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय करण्यात असल्याचे सांगून, त्यांनी प्रस्थापित हटावचा नारा देत आपची विचारधारा हेच आशेचे किरण नगरकरांना विकासात्मकतेकडे घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट केले. उमेदवार जयश्री शिंदे यांनी आम आदमी पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष असून, सुज्ञ जनता माझ्या पाठीशी उभी राहणार असल्याचे सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मार्केटयार्ड येथील महात्मा फुले चौकात परिवर्तन सभा घेण्यात आली. यावेळी आपचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.जावेद काझी, अ‍ॅड.शिवाजी डमाळे, मेजर रावसाहेब काळे, आपचे उमेदवार जयश्री शिंदे (प्रभाग क्र.14 क), सुभेदार भाऊसाहेब आंधळे (प्रभाग क्र.2 ड), सागर अलचेट्टी (प्रभाग क्र.4 ड), दिलीप घुले (प्रभाग क्र.5 अ), योगेश खेंडके, रजनी ताठे, आपचे किरण उपकारे, संपत मोरे, राजेंद्र कर्डिले, अ‍ॅड.महेश शिंदे, रत्नमाला शिंदे, रेखा नगरे, नयना बनकर, सुधाकर वाघमारे, नानी वाघमारे, दिनेश शिंदे, ओंकार वाघ, संदेश पाटोळे, डॅनियल पठारे, संतोष धीवर, मिलिंद डंबे आदि.