Breaking News

आज महिला विषयक कार्यशाळेचे आयोजन -केदारबीड (प्रतिनिधी)- महिला आयोग मुंबई व कै.अण्णासहेब पाटील सेवाभवी संस्था चांदेगाव ता.जी.बीड यांच्या सयुक्त विद्यमानाने महिला विषयक कायदे अधिकार व त्यांचे कर्तव्य या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले असुन जिल्हातील सर्व महिलांनी या कार्यशाळेचा मोठया संख्येने लाभ घ्यावा असे अवाहन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन सरकारी वकील ड.मंजुषा दराडे सा.पो नि.विशाखा धुळे, सामाजिक कार्यकत्या मनिषा तोकले तसेच संध्याताई राजपुत, सविताताई शिदे प्राचार्य डॉ.नामदेव सानप यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ महाविदयालय वविदयापीठविकास मंडळाचे मा.सदस्य् तथा संस्थेचे अध्यक्ष रमेशभाऊ पोकळे उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेचे आयोजन .दि.०५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वा वसंतराव काळे पत्रकारीता व संगणकशास्त्र महाविदयालयातील कॉन्फरन्स् हॉल माने कॉम्प्लेक्स, बीड येथे केले आहे या कार्यक्रमात महिलांना त्यांचे हक्क् समजावे त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी महिला विषयक कायदे कोणते असतात महिलांनी या सर्व अधिकारांचा कसा वापर करावा यावर मार्गर्शक मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आयोजनकांनी दिली आहे.