Breaking News

शेतकर्‍याचा कांद्याच्या चाळीतच गळफास


नाशिक (प्रतिनिधी)- एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे कांद्याचे घसरलेले भाव यामुळे तात्याभाऊ खैरनार हे शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे खैरनार यांनी कांदा चाळीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भडाणे गावात ही घटना घडली. खैरनार यांच्यावर बँकांचे कर्ज होते. अशातच कांद्याचे भाव सध्या प्रचंड घसरले आहेत. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने थकीत कर्ज फेडावे तरी कशी ही विवंचना त्यांना होती. त्यातून निराश होत त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.