Breaking News

जहागिर मोहा येथील माजी सरपंच संपतराव राठोड यांचे निधन


किल्ले धारुर (प्रतिनिधी) तालुक्यातील जहागिर मोहा येथील माजी सरपंच संपतराव कारभारी राठोड यांचे अल्पश: आजाराने दि.१६ रविवार रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संपतराव राठोड हे जहागिर मोहा या गावाचे एक वर्षे सरपंच व वीस वर्षे उपसरपंच होते. अतिशय शिस्तप्रिय व मनमिळावू स्वभाव असल्याने ते सर्व परिचित होते. ते माजी मांत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांचे खंदे समर्थक होते. मागिल काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरु असतानाच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर रविवारी चांभारतळ तांडा येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.