Breaking News

आ.बोंद्रे यांनी अपंगांस दिली तिनचाकी सायकल

चिखली,(प्रतिनिधी): घरी गुठांभर शेती नाही, मोलमजुरी करून जिवन जगणे हा नित्यक्रम, पदरात एक मुलगा व एक मुलगी, जोडीला पत्नी शेतमजुरी करून घर संसाराला हातभार लावीत होती. अशा प्रकारे आर्धे अधिक जिवन जगून झाल्यानंतर पायाला गँगरीण झाले. कसे बसे उधार उसणवारी करीत पायाची शस्त्रक्रीया केली, त्यात अर्धा पाय तोंडुन टाकावा लागला आणि  संसाराचा गाडा कोलमडला. मोलमजुरीसाठी बाहेर जाता येत नाही. मुलांचे शिक्षण कसे पुर्ण व्हावे, घर कसे चालवायचे या विवंचणेत सापडलेल्या गांगलाव येथील गजानन त्र्यंबक काळे  यांची माहिती जनसंपर्क अभियाना दरम्यान मिळताच चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी  अनुराधा मिशनच्या माध्यमातुन तीनचाकी सायकल उपलब्ध करून देत जयपूर फुट बसवुण देण्याचेही निर्देश दिले.

         गागंलगांव येथील गजानन काळे यांना तिनचाकी सायकलीची ही मदत जागतीक अपंग दिनाचे औचित्य साधुन नुकतीच 3 डिसेंबर रोजी कॉगे्रस कमिटीच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त नियोजन सभे दरम्यान आ. राहुल  बोंद्रे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थिीत देण्यात आली. ही सायकल स्विकारण्यासाठी गजानन काळे यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलगा हजर होते. लवकरच त्यांना जयपुर फुट बसविण्यात येणार आहे.

         सदर सायकल वितरण प्रसंगी प्रदेश कॉगे्रसचे सरचिटणीस शामभाउ उमाळकर, पक्षनेते लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प.अध्यक्षा अलकाताई रणबावरे, सुधाभाउ धमक, समाधान सुपेकर, संजय पांढरे, अनंत वानखेडे, सतिश मेहेद्रे, गणेश पाटील, रामभाउ जाधव, जयश्रीताई शेळके, डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्‍वर सुरूशे, रमेश सुरडकर, देवानंद पवार, मदनराव म्हस्के, शिवाजी म्हस्के, प्रल्हाद म्हस्के, जितु वाघ,  कलीम खान मेहकर, किशोर सोळंकी, अ‍ॅड वानखेडे, दत्ता आंभोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.