‘सह्याद्री’च्या पाठीशी ठाम राहणार : खा. उदयनराजे


सातारा, (प्रतिनिधी) : माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम यांनी लोकसेवेचा वसा घेतला होता. तोच वसा आता सह्याद्री यांनी पुढे चालवावा. आपण सर्वांनी सह्याद्रीच्या पाठिशी उभे राहावे. माझे व कदम घराण्याचे संबध जिव्हाळयाचे असून, यापुढे सह्याद्री कदम हा माझा धाकटा बंधू म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. 
गिरवी (ता. फलटण) येथे माजी आमदार चिमणराव कदम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, शारदादेवी कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाषराव शिंदे, डॉ. जे. टी. पोळ, अच्युतराव खलाटे, पृथ्वीराज काकडे, सह्याद्री कदम उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी आमदार चिमणराव कदम अभ्यासू व दूरदृष्टी असणारे नेतृत्व होते. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाची पात्रता असताना केवळ राजकारणामुळे त्यांना बाजूला केले गेले, असेही ते म्हणाले. 
माजी आमदार चिमणराव कदम एक अभ्यासू व दूरदृष्टी नेतृत्व होते. त्यांच्याकडे कर्तृत्व होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची पात्रता असताना केवळ राजकारणामुळे त्यांना बाजूला केले गेले. त्यांचे नाव पुढे येत होते पण राजकारणामुळे ते शक्य झाले नाही. फलटण तालुक्यातही लोकांवर अन्याय होतोय. पाच राज्यात जर सत्तापालट होत असेल तर फलटणमध्ये का नाही ? असा प्रश्‍न खासदार भोसले यांनी उपस्थित करत नाव न घेता फलटण तालुक्यातील सत्ताधार्‍यांवर टीका केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget