Breaking News

शेतकर्‍यांनी ई-नाम कार्यप्रणालीचा लाभ घ्यावा; कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन


संगमनेर/प्रतिनिधी
कृषि उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे राष्ट्रीय कृषि बाजार ई नाम पोर्टलची उभारणी झालेली असुन शेतमाल खरेदी विक्री व्यवहार ई नाम कार्यप्रणालीनुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना त्यानुसार शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल. 

राष्ट्रीय कृषि बाजार ई नाम अंतर्गत शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपले आधारकार्ड, बँक पासबुक खाते क्रंमाक, मोबाईल नंबरसह बाजार समितीच्या गेटवर नोंदणी करावी लागते. गेटवर नोंदणी झाल्यानंतर शेतकर्‍यांना शेतमालाचा लॉट नं. देण्यात येतो. 

त्यानंतर शेतमालाची गुणवत्ता तपासणी करण्यात येते. इलेक्ट्रॉनिक किंवा वे ब्रिज काट्यावर शेतमालाचे वजनमाप करण्यात येते. त्यानंतर व्यापारी ऑनलाईन पध्दतीने शेतमालावर बोली लावतात. सर्व शेतकरी बांधवानी आपल्या शेतमालाची खरेदी विक्री ऑनलाईन पध्दतीने करावी, असे आवाहन बाजार असे आवाहन शंकरराव खेमनर, सतिष कानवडे व सतिष गुंजाळ यांनी केले आहे.