Breaking News

दिरानेच केला वहिनीचा विनयभंगसंगमनेर/प्रतिनिधी
मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणार्‍या एका 23 वर्षीय महिलेवर तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील शिंदोडी गावात घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, यातील आरोपी हा पीडित महिलेचा मोठा दिर असून पिडीत महिला हि एकत्र कुटुंब पद्धतीने राहते ज्यात तिची दोन मुले, पती, सासू, सासरे, मोठा दिर व त्याची पत्नी आणि लहान दिर असे राहतात. यातील मोठ्या दिराची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी गेली होती.

 तेव्हापासून मोठा दिर आपल्याकडे वाईट नजरेने बघत असल्याची तक्रार तिने सासू सासर्‍यांकडे केली. परंतु त्यांनी तिची बाब काही मनावर घेतली नाही. मात्र शुक्रवार दि. 30 रोजी रात्री नऊच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलाबरोबर झोपली असता आरोपी दिर तिच्या जवळ आला आणि पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच त्याने तिला काठीने बदडले व जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार महिलेने पतीसह सासू सासर्‍यांना सांगितलं; परंतु त्यांनीदेखील या घटनेची दखल घेऊन दिराला समज देण्याचा प्रयत्नही केला नाही.

 त्यामुळे पीडित महिलेने आपल्या माहेरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला आणि स्वतः घारगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन आरोपी दिराविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी दिराविरोधात भादंवि कलम 354 (अ ), 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास ए. आर. गांधले करीत आहे.