Breaking News

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा भारिपकडून निषेधअहमदनगर: भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबध असल्याचे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी नगर शहरात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भारिप बहूजन महासंघाकडून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. तसेच याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन भारिपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केले. 

अहमदनगर महापालिका निवडणूकांच्या प्रचारादरम्यान, ना. कांबळे शहरात आले असता, अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा नक्षलवाद्यांशी संबध असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे. त्यांच्या या व आक्षेपार्ह वक्तव्याचा भारिप बहुजन महासंघ व तमाम आंबेडकरी अनुयायाकडून ना. दिलीप कांबळे यांचा जाहीर निषेध करतो. त्यांच्या या प्रक्षोभक वक्तव्यामुळे सामाजिक धुव्रीकरण होऊन जातीय दंगली घडवण्याचा कट असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ना. दिलीप कांबळे यांच्या या आक्षेपार्ह आणि बेजबाबदार वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात येण्याची मागणी यावेळी भारिपकडून करण्यात आली. यावेळी भारिपचे जिल्हा महासचिव दिलीप साळवे, शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, नगर तालुका सचिव जीवन कांबळे आदी उपस्थित होते.