Breaking News

किर्तनातून चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलांना अटक


नगर । प्रतिनिधी-
कीर्तन सुरू असताना पार्किंग केलेल्या कारमधून 35 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. 

श्रीगोंदा तालुक्यातील माठा शिवारात किशोर घेंगडे यांच्या कारमधून ही चोरी झाली होती.चोरीचा मोबाईल माणिक पांडुरंग घेंगडे (वय-49) हा वापरत असल्यामुळे पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. एसपी रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील पो. हे. कॉ. विजयकुमार वेठेकर, संदीप पवार, संतोष लोंढे, रवींद्र कर्डिलेे, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, बबन बेरड आदींनी ही कारवाई केली. या दोन अल्पवयीन मुलांनी गुन्हा कबूल केल्याचे पवार यांनी सांगितले.