Breaking News

हिवरा खुर्द येथे महापरिनिर्वाण दिन साजराहिवरा खुर्द,(प्रतिनिधी)हिवरा खुर्द ता.मेहकर येथे  6 डिंसेबर रोजी सकाळी 8 वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महानिर्वान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  दीप प्रज्वलन करण्यात आले. शेषराव वानखेडे  यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अभिवादन केले.अर्जुन शेळके यांनी मार्गदर्शन केले. तेजराव वानखेडे, राजू खरात, कैलास खरात,  चोखा अंभोरे,  बळीराम अंभोरे, सतीश वानखेडे, भारत खरात, विष्णु पैठणे, यांच्यासह उपासक उपस्थित होते. संचालन अनिल वानखेडे यांनी केले. समाधान पैठणकर, सरपंच रामराव खरात, सुधाम वानखेडे, व पत्रकार उत्तम खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.