गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी तत्काळ जमा करा : शिवसंग्रामची मागणी


देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): गॅस ग्राहकांना गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी(अनुदान)येथील ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याबाबतची तक्रार शिवसंग्राम संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे करण्यात आली असून, गॅसवरील सबसिडी तात्काळ ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. निवेदनात नमूद आहे की,देऊळगाव राजा शहर व तालुक्यातील बहुसंख्य गांवातील गॅस धारकांना गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी(अनुदान)ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत नाही. त्यामुळे गॅस धारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

यासंदर्भात गॅस ग्राहकांनी तोंडी व लेखी तक्रारी गॅस वितरक एजन्सीकडे अनेक वेळा करून देखील त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. गॅस ग्राहकांनी गॅस एजन्सी व संबंधीत बँकेकडे विचारपूस केली असता ते उडवा-उडवीचे उत्तरे देतात.त्यामुळे गॅस ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गॅस सिलिंडरवरची सबसिडी बँक खात्यात जमा होण्याची योजना ही गॅस कंपनी व शासनामार्फत स्वयंचलीत पद्धतीने राबविली जाते.मात्र अनेक गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडी जमा होत नसल्याच्या तक्रारी आहे.याच्या अर्थ एकतर शासन सबसिडी गॅस वितरक कंपनीकडे जमा करत नाही किंवा गॅस वितरक कंपनी ती जमा होऊन सुद्धा गॅस ग्राहकांच्या खात्यात करीत नाही. या दोन्ही परिस्थितीस गॅस वितरक कंपनीची भूमिका महत्त्वाची असते.परंतु येथील गॅस एजन्सी याबाबत गंभीर दिसत नाही .याकडे संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत संबंधीत विभागाने चौकशी करून तात्काळ गॅस ग्राहकांना मिळणारी सबसिडी त्यांच्या बँक खात्यात जमा करावी,अन्यथा गॅस एजन्सी कार्यालयात शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, संघटक जहीर पठाण,शंकर शिंदे,अल्फ.संख्यांक अध्यक्ष अजमत पठाण,संतोष हिवाळे,आयाज पठाण,विनोद खार्डे,सुरेश निकाळजे,अनिस पठाण,मदन डुरे यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget