Breaking News

मालवणमध्ये सलग दुसर्‍या दिवशी जलतरणपट्टूचा समुद्रात बुडून मृत्यू


मालवण ः सागरी जलतरण स्पर्धेच्यावेळी एका जलतरणपटूचा बुडून मृत्यू झालेला असतानाच आज आणखी एका स्पर्धकाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. अर्जुन वराडकर असे या स्पर्धकाचे नाव आहे. 

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्जुन वराडकर (50) हे मुंबईहून मालवणला आले होते; मात्र पोहताना त्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. कालही सुरेखा गलांडे या नाशिक येथील महिलेचा समुद्रात सराव करत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. गलांडे या त्यांच्या मुलासह मालवणला आल्या होत्या. दिव्यांग गटातून त्यांचा मुलगा या स्पर्धेत भाग घेणार होता. शनिवारी सकाळी त्या चिवला बीचवर सरावासाठी गेल्या असता पाण्यात बुडाल्या.