Breaking News

लाचलुचपतच्या प्रमुखांविरोधात महिलेच्या लैंगिक छळाचा गुन्हा


नागपूर (प्रतिनिधी)- नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख पी. आर. पाटील यांच्याविरोधात सहकारी महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ केल्याबद्दल गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील करोडो रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) ते अध्यक्ष आहेत. पाटील यांच्यावर आपल्या टीममधल्या एका महिला कॉन्स्टेबलकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात 28 वर्षीय पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. मुंबईस्थित एका महिला अधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. चौकशीमध्ये पाटील दोषी आढळल्याने त्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.