Breaking News

धनगर, मुस्लिम आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती होऊ देणार नाही - मासाळजामखेड ता./प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा विषय गाजतोय, मात्र सरकारने मराठा आरक्षण दिले असले तरी ते न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. तसेच सरकारने मेगा भरती सुरू केली आहे. याला आमचा विरोध नाही मात्र धनगर व मुस्लिम समाज्याला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत मेघा भरती होऊ देणार नाही. असे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केले. हजरत टिपु सुलतान, बिरसा मुंडा जयंती, महात्मा फुले स्मृतीदिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू या ठिकाणी एम. जे. ग्रुप जामखेड यांच्या वतीने दि 4 रोजी सार्वजनिक अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड तालुक्यातुन टिपु सुलतान जंयती साठी नान्नज, जवळा, खर्डा, झिक्री, पाटोदा, पिंपरखेड, हळगाव येथून सर्व जाती धर्माचे नागरिक आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुकर आबा राळेभात होते. सुभाष आव्हाड, शहाजीराजे भोसले, अमजद पठाण, जमिर सय्यद, अमित चिंतामणी, पवन राळेभात, अवदुत पवार, भगवान गीते, अरुण जाधव, विकास मासाळ, शाकीर शेख, आर्शद शेख, विकी सदाफुले, वसीम कुरेशी, हुसेन मुल्ला, सलमान सय्यद, मुजाहेद कुरेशी, वसीम सय्यद, सिजान सय्यद, अवेज कुरेशी, वसीम इनामदार, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना मासाळ यांनी असे प्रतिपादन केले की, महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम, धनगर व शेतकरी आंदोलन सुरू आहेत. मात्र सरकारच्या दबावापोटी ही आंदोलने चिरडून टाळण्याचे काम सुरू आहे. मात्र हा डाव राष्ट्रवादी हाणून पाडल्याशिवाय रहाणार नाही. या नंतर व्याख्याते अमोल मिटकरी बोलताना यांनी असे प्रतिपादन केले की, अनेक महापुरुषांच्या जयंती साजरी होतात मात्र टिपु सुलतान यांची जयंती कोणी साजरी करत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. टिपु सुलतान यांनी अनेक हिदुंची मंदिरे बांधली यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

 टिपु सुलतान यांचा काळ इंग्रज अधिकार्‍यांनी लिहुन ठेवला आहे. एवढी मोठी ख्याती त्यांची आहे. ब्रिटिशां विरोधात बंडाचे हत्यार टिपु सुलतान यांनी उपसले होते. भारताच्या इतिहासात कधी संविधान जाळलं नाही ते या सरकारच्या काळात जाळले जाते. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.