Breaking News

बेलगाव येथे केंद्रीय पथकाने दुष्काळी स्थितीची केली पाहणी


 शेवगाव/प्रतिनिधी
बेलगाव येथे केंद्राकडून पिक पाहणी चापडगाव ता शेवगाव तालुक्यातील बेळगाव येथे केंद्रीय पथकाने दुष्काळी स्थितीचा दौरा केला. यावेळी ज्वारीची करपलेली पिके हरभर्‍याची जळलेली पिके तसेच अन्य रब्बीची पिके यांची पाणी केंद्रीय पथकाने पल्या धावत्या दौर्‍यांमध्ये केली. या पथकामध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी अधिकारी सुभाषचंद्र मीना टेंभुर्णे, एम.जी. विजय ठाकरे ,कृषी आयुक्त दीपक म्हैसकर,विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे ,जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे, उपविभागीय अधिकारी देवदत्त केकान, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोर्‍हाडे शेवगाव ते तहसीलदार विनोद भामरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साई मंडळ कृषी अधिकारी प्रकाश करपे, कृषी पर्यवेक्षक सचिन कुसळकर, कृषी सहाय्यक बाळकृष्ण विघ्ने, अनंत रणमाळे , व्ही. व्ही. बडे या पथकामध्ये होते