Breaking News

डिवायएसपी नवटके यांची बदली रद्द करा म्हणून सकल मराठा समाजाचा बंदचा ईशारावडवणी, (प्रतिनिधी):- माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा माजलगावमध्येच नियुक्ती द्या या मागणीसाठी आता सकळ मराठा समाज मैदानात उतरला आहे. सकळ मराठा समाजाच्यावतीने काल दुपारी वडवणी पोलिसांना निवेदन देण्यात आले असुन नवटके यांची बदली रद्द करा अन्यथा ६ डिसेंबर रोजी वडवणी तालुका कडकडीत बंद करण्यात येईल असा ईशारा दिला आहे. 

माजलगाव येथील पोलिस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांची वादग्रस्त व्हिडीओ क्लिप प्रकरणी औरंगाबादला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नवटके यांची बदली तात्काळ रद्द करुन त्यांना पुन्हा माजलगाव येथे नियुक्ती द्यावी अशी मागणी सकळ मराठा समाजाच्यावतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. बदली रद्द न केल्यास मराठा समाजाच्या वतीने ६ डिसेंबर रोजी वडवणी तालुका बंदचा ईशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर परमेश्‍वर मस्के, गणेश आजबे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.