Breaking News

सुरक्षा दलावरील हल्ल्यात ठोकरचा सहभागकाश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांच्या हत्येत जहूरचे नाव समोर आले होते. त्यामुळे सुरक्षा दलाचे हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. पुलवामामधील सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांमध्ये तो सामील होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.